सिंधुदुर्ग: कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी हापा – मडगाव एक्सप्रेससह हिसार- कोईमतूर साप्ताहिक एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले. त्यानुसार २२९०९८ / २२८०७ क्रमांकाची हापा-मडगाव एक्सप्रेस २९ मार्च रोजी तर परतीच्या प्रवासात. –
३१ मार्च रोजी एक स्लीपर श्रेणीच्या अतिरिक्त डब्यांची धावणार आहे. २२४७५/२२४७६ क्रमांकाची हिसार-कोईमतूर साप्ताहिक एक्सप्रेस ४ एप्रिलपासून २६ एप्रिलपर्यंत तर परतीच्या प्रवासात ८ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत एक अतिरिक्त डब्याची धावणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा