✴️जनशक्तीचा दबाव न्यूज
⏩मुंबई : भारतीय शेअर बाजाराने आजच्या तिसऱ्या व्यवहार सत्रात संमिश्र सुरुवात केली पण बाजार उघडताच पुन्हा एकदा बाजाराचे दोन्ही निर्देशांक – सेन्सेक्स आणि निफ्टीने किरकोळ अशी उसळी घेतली. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्सने ५७ हजार ८०० अंकांचा टप्पा ओलांडला तर निफ्टीत देखील बाजार उघडताच वाढ झाली.
⏩शेअर बाजाराची संमिश्र सुरुवात
मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ४१.६४ अंक घसरून ५७,५७२.०८ अंकांच्या पातळीवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५० शेअर्सचा निर्देशांक एनएसई निफ्टी २५.६० अंक किंवा ०.१५ टक्के घसरणीसह १६,९७७.३० वर खुला झाला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० पैकी २४ समभाग तेजीसह वाटचाल करताना एनएसई निफ्टीच्या ५० पैकी ३९ शेअर्समध्ये वाढीसह व्यवहार होताना दिसत आहे. याशिवाय १० समभाग घसरणीसह तर एक स्टॉक अपरिवर्तित व्यवहार करत आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवसाय दिसून येत असून जपानचा निक्केई आणि तैवान तसेच दक्षिण कोरियाचा कोप्सी देखील किरकोळ तेजीने व्यवहार करत आहेत.