⏩️ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 31मार्चपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

Spread the love

⏩️रत्नागिरी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली असून, अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

⏩️महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा  विभागामार्फत क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रिडा महर्षिंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. 

⏩️शासन निर्णय दि. 14 डिसेंबर 2022 नुसार काही खेळाडूंचे फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्या कारणाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019- 20, 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता अर्ज सादर करू शकले नाहीत. अशा खेळाडूंचे नुकसान होऊ नये व हे खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये. याकरीता अशा खेळाडूंनी (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता पात्र खेळांमधील ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात असे सहभागी/प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त) त्यांचे प्रस्ताव व विहीत नमुन्यातील अर्ज (खेळाडू)दि. 31 मार्च, 2023 पर्यंत संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत.

⏩️दि.14 डिसेंबर, 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील खेळाडू (ज्या खेळाच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात असे सहभागी/प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त) यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा विहीत नमूना https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  हा विहित नमूना डाऊनलोड करून व व्यवस्थितरित्या भरुन संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिनांक 31 मार्च, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावा असे आवाहन जिल्हा क्रिडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page