⏩मुंबई :* तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक केलं आहे का? नसेल तर लवकर आधार-पॅन लिंक करा. पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. त्यामुळे आधार-पॅन लिंक करण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. १ एप्रिलपासून पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुम्ही ३१ मार्च आधी हे लिंक शकला नाहीत तर तुम्हांला १ एप्रिल २०२३ पासून तुम्हाला लिंक करण्यासाठी दंड भरावा लागेल. त्यामुळे ज्यांनी आत्तापर्यंत आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केलं नसेल, त्यांनी हे काम आजच करुन घ्या. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका.
⏩पॅन – आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च जर तुम्ही आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केलं नाही तर, तुमचे पॅन कार्ड काहीही उपयोगाचं ठरणार नाही. आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे, त्याशिवाय अनेक कामे होऊ शकत नाहीत. विशेषत: रिटर्न आणि आयकर भरण्याशी संबंधित कोणतेही काम पॅनकार्डशिवाय करता येत नाही. त्यामुळे लगेचच पॅन-आधार लिंक करा. ३१ मार्च नंतर आधार-पॅन लिंक करण्यासाठी १००० रुपयांचा दंड भरावा लागेल.
पॅन-आधार लिंक नसेल तर काय होईल? जर पॅन आधारशी लिंक नसेल तर आयकर रिटर्न मिळणार नाही. तसेच तुम्ही पॅन कार्ड वापरू शकणार नाही आणि दुसरे पॅन कार्ड बनवू शकत नाही. पॅन कार्ड नसेल तर आर्थिक कामांमध्ये अडचणी येतील.