मुंबई : सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी घोषण केंद्र सरकारने केली असून आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. 30 जूनपर्यंत आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येणार आहे. या आधी ही मुदत 31 मार्च होती. आता ती वाढवण्यात आली आहे.
आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत जरी वाढवली असली तरी दंड मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी त्यांचं आधार-पॅन अद्याप लिंक केलं नाही त्यांना 1000 रुपये भरून ते लिंक करता येणार आहे.
आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे, त्याशिवाय अनेक कामे होऊ शकत नाहीत. विशेषत: रिटर्न आणि आयकर भरण्याशी संबंधित कोणतेही काम पॅनकार्डशिवाय करता येत नाही. या आधी आधार पॅन लिंक करण्याची मुदत ही 31 मार्च होती. अनेक लोकांचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक नाही. हे लिंकिंग करण्यासाठी लोकांची एकच धावपळ उडाली होती. त्यामुळे सर्व्हर प्रॉब्लेमही होत असल्याच्या तक्रारी होत्या.