![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/03/gunratne-sadavarte-90860984.jpg)
ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षांकरिता वकीलीची सनद रद्द करण्यात आली आहे. ॲड.सुशिल मंचरकर प्रकरणात सदावर्ते याची दोन वर्ष वकीली सनद रद्द केली आहे. सदावर्ते यांनी वकिलाचा ड्रेस परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती.
अशा कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होते. यामुळे सदावर्ते यांच्या विरोधात वकील सुशील मंचरकर यांनी शिस्त पालन याचिका तक्रार केली होती. आज याबद्दल बार कौन्सिलच्या तीन सदसिय समितीने निकाल देत सदावर्ते यांची दोन वर्षे सनद रद्द केली आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांना पुढील दोन वर्षे वकिली करता येणार नाही.