संगमेश्वर – दिवा शहरातील असंख्य कोंकण रेल्वे प्रवाश्यांनी संगमेश्वर रोड येथे नेत्रावती व मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडयांना थांबा मिळावा या मागील तीन वर्षांपासून असलेल्या मागणीला जोरदार प्रतिसाद देत याविषयी संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीच्या मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्रे लिहून मागणी केली आहे. दिवा शहरातील कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अवघ्या दोन तासात सुमारे 1743 मागणीपत्रे तयार करून देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अजुनही हजारो प्रवासी अशी मागणीपत्र देणार असून ती लवकरच रेल्वे राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवण्यात येतील असे संदेश जिमन यांनी सांगितले.