![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/03/images-36.jpeg)
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील व्यापारीदृष्ट्या महत्वाचा असणाऱ्या आंबाघाटाला पर्याय म्हणून साखरपा-देवडे रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी बजेटमध्ये एक कोटी निधी मंजूर झाल्याचे दीपक बेर्डे यांनी सांगितले.
देवडे गावचे रहिवाशी दीपक बेर्डे यांच्या मागणीनुसार, आमदार प्रसाद लाड यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वेक्षणासाठी निधी मंजूर केल्यामुळे साखरपा-देवडे आंबाघाट रस्ता होण्याची आशा बळावली आहे.
बेर्डे यांनी मागणी लावून धरल्यामुळे अखेर यश प्राप्त झाले. गेल्या वर्षी अतिवृष्टीत आंबाघाट अनेक ठिकाणी कोसळून 14 दिवस बंद होता. त्यामुळे प्रवासी व व्यापारीदृष्ट्या सर्वच यंत्रणा बंद होती. त्यामुळे सततची होणारी आंबाघाटाची अवस्था पाहता पर्यायी मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे.