
⏩नागपूर – देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला असा धमकीचा फोन नागपूर पोलिसांना सोमवारी रात्री आला. यानंतर नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने रात्री १२ च्या सुमारास देवेंद्र फडणवीसांच्या घराची तपासणी केली. परंतु हा कॉल फेक असल्याचे त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले.
⏩बॉम्ब ठेवल्याचा फोन करणारा व्यक्ती हा वैयक्तिक कारणामुळे दुखावला होता पोलिसांच्या केवळ दिशाभूल करण्यासाठी या व्यक्तीने हा फेक कॉल केला. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढी कारवाई केली जात असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.
⏩म्हणून दिली बॉम्ब ठेवल्याची धमकी
देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन रात्री उशिरा नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. धमकीचा फोन आल्यावर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. रात्री बाराच्या दरम्यान या संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. त्यानंतर हा फेक कॉल असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. घरातील लाईट गेली असल्याने संतापून या व्यक्तीने फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली अशी माहिती समोर आली आहे.