☸️दापोली नगर पंचायतीच्या सादर झालेल्या शिलकी अर्थसंकल्पात विरोधकांनी काढल्या ३६ त्रुटी

Spread the love

⏩दापोली, प्रतिनिधी : दापोली नगरपंचायतीचा नुकताच शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र याला विरोधकांनी चांगलाच आक्षेप घेतला असून ३६ त्रुटी काढल्या आहेत. मुख्याधिकाऱ्यांकडे आपल्या लेखी हरकती नोंदवल्या आहेत.

⏩येथील नगर पंचायतीचा अर्थसंकल्प फेब्रुवरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नगर पंचायतीच्या सभागृहात सादर करण्यात आला. मात्र यांचे निमंत्रण सदस्यांना आदल्या दिवशी सायंकाळी मिळाल्याचे यावर चर्चा करण्यासाठी व अभ्यास करण्यसाठी वेळ मिळाला नसल्याचे कारण सांगत विरोधकांनी या सभेतून सभात्याग केला होता.

⏩यानंतर विरोधकांनी यातील तब्बल ३६ त्रुटी काढून त्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी कळवल्या आहेत. यावर मुख्याधिकारी कोणते उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेत ९ कोटी ४१ लाख १ हजार ५०० रपये एकूण महसूल जमा रकमेचा व ७ कोटी ८७ लाख ६५० एकूण महसुली खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये कर व दर चया लेखशीर्षाखाली ४ कोटी ११ लाख १० हजार १०० रुपये, विशेष अधी वसुली या लेखाशीर्षाखाली ८९ लाख ८५ हजार २०० रपये मिळकतीपासूनचा महसूल २९ लाख १९ हजार ५००, अनुदान २कोटी ८९ लाख ६५ हजार ५०० तर संकीर्ण १ कोटी १२ लाख २० हजार ४०० असा ९ कोटी ४१ लाख १ हजार ५०० रूपये महसुली जमा असणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

⏩तसेच सामान्य प्रशासन वसुली या लेखाशीर्षाकरिता ५ कोटी २२ हजार ४५० रुपये खर्च, सार्वजनिक सुरक्षितता याकरिता २३ लाख ५ हजार ६०० रुपये खर्च सार्वजनिक आरोग्यवर १ कोटी ५३ लाख ६७ हजार खर्च, सार्वजनिक शिक्षणाकरिता केवळ ४०० रुपये, अंशदानेकरिता ६५ लाख, संकीर्णकरिता ४५ लाख ६ हजार २०० रुपये असा एकूण मिळून ७ कोटी ८७ लाख ६५० महसुली खर्च असणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यातील अनेक लेखाशीर्षांना विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. यातील अनेक खर्च हे अनावश्यक असल्याचे, तर काही खर्च यापूर्वीच बंद झाले असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी दापोली नगर पंचायतीला लेखी स्वरुपात कळवलेले आहे. या विरोधकांनी घेतलेल्या हरकतींवर प्रशासन कोणती भूमिका घेते की, आहे तसाच अर्थसंकल्प मंजूर होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page