चिपळुणात मोदी सरकारचा धिक्कार!

Spread the love

राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध, चिंचनाक्यात जोरदार निदर्शने*

⏩राहुल गांधींच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम

⏩काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

➡️ चिपळूण : काँग्रेसचे नेते व खासदार मा. राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने संपूर्ण देशभर आंदोलनाचे संतापाची लाट पसरली आहे. चिपळूण तालुक्यातही याचेही तीव्र पडसाद उमटले. राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ आज चिपळूण तालुका काँग्रेस, शहर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आयोजित केलेल्या आंदोलनात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. चिंचनाका परिसरात सकाळी 10.30 वा. मविआच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करताना जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारचा धिक्कार केला. तसेच यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीमही राबविण्यात आली. या आंदोलनात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे, राष्ट्रवादीचे दिलीप माटे, सूर्यकांत खेतले, मयूर खेतले, शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत, काँग्रेसचे रफीक मोडक, जनार्दन पवार, नंदू थरवळ, माजी सभापती पूजा निकम, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा जागृती शिंदे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी भुस्कुटे, रविना गुजर, तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, शहराध्यक्षा श्रद्धा कदम, शिवसेना महिला विधानसभा क्षेत्र संघटक स्वाती देवळेकर, महिला शहरप्रमुख वृषाली शिंदे, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या विरोधातील घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. चिंचनाका परिसरात निदर्शने केल्यानंतर आंदोलनकर्त्यांचा मोर्चा भोगाळेमार्गे प्रांताधिकारी कार्यालयाकडे गेला. यावेळी मविआच्या नेत्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि निवेदन सादर केले. या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याबद्दल चिपळूण तालुका काँग्रेस आणि चिपळूण शहर काँग्रेसच्या वतीने सर्वांना धन्यवाद देण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page