
🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | गुहागर | मार्च २७, २०२३.
🔹 गुहागर तालुक्यातील पडवे गटात असणाऱ्या आंबेरे खुर्द गावातील ‘आकारातला वड ते भुवडवाडी’ गाव जोड रस्त्याचे भूमिपूजन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष जैतापकर यांच्या हस्ते संपन्न झाले. परिसरातील लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन या रस्त्यासाठी स्वतः निधी खर्च करण्याचे औदार्य जैतापकर यांनी दाखवले, याबाबत ग्रामस्थ आणि या रस्त्याचे अन्य लाभार्थी जैतापकर यांचे मनापासून ऋणी आहेत अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून येत आहेत.

🔹 यापूर्वी या भागात प्रवास करताना या वाडीतून त्या वाडीत जाण्यासाठी जवळपास ५ किमीचा वळसा घालून जावे लागत असे. मात्र या रस्त्याच्या कामामुळे दळणवळण सुकर झाल्याचे वाडीतील लोकंनी म्हटले आहे. सदर रस्त्याच्या भूमिपूजन समारंभासाठी श्री. संतोष जैतापकर, ओबीसी संघर्ष समितीचे गुहागर तालुकाध्यक्ष श्री. पांडुरंग पाते, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. निलेश सुर्वे, भाजपा तालुका सरचिटणीस व माजी पंचायत समिती सदस्य श्री. विजय भुवड, गुहागर तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र अवेरे, श्री. विनायक सुर्वे, गावकर श्री. शंकर भुवड, मानकरी श्री. पांडुरंग अवेरे, मानकरी श्री. गणपत भुवड, श्री. गौतम गमरे, श्री. बौद्धदास गमरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.