१० ते १२ गावांना जोडणारा गुढे कोंडवी रस्ता आझादीच्या अमृतमोहोत्सवात देखील डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत

Spread the love

कोकण (निलेश कोकमकर/शांताराम गुडेकर ) चिपळूण तालुक्यातील अगदी दुर्गम भागातुन जाणारा त्याच प्रमाणे ३५ किलोमीटर दूर असलेल्या गुढे -कोंडवी हा जीवघेना रस्ता.अगदी रामपूर गुढेफाटा ते मिरवणे-गुढे कोंडवी मार्गे कळंबट असा जवळजवळ २० किलोमीटरचा आहे.यामुळे उमरोली, पाथर्डी, मिरवणे, शिरवली, ओंबळी, ताम्हनमळा, डुगवे, गुढे,कळ॔बट, कुटगिरी अशा अनेक गावांना जोडणारा रस्ता तो म्हणजे गुढे- कोंडवी रस्ता होय. परंतु या रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे.

त्याचा त्रास गेली २० वर्ष येथील स्थानिक ग्रामस्थ सहन करत आहेत.पण राजकीय लोक प्रतिनिधींना त्याची चिंता अजिबात राहिलेली नाहीय.या मार्गात येणाऱ्या शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यंनाचे हाल होत असता.त्यात रस्ता चांगला नाही म्हणून एक एस.टी बस शिवाय अन्य गाड्या नसतात.त्यामुळे अनेकदा पायपीट करावी लागते.एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी देखील अनेक अडचणीला सामोरे जावं लागत.नाही तर कधी कधी रुग्ण दवाखान्यात पोहचत सुद्धा नाही.आझादीच्या अमृतमोहोत्सवात देखील खेडेगावातील अशी अवस्था आहे. याबाबत गावातील स्थानिक राजकीय सदस्य, पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पुढारी,आमदार, खासदार फक्त निवडुका आल्या कि गावात येणार आश्वासनं देणार पण त्यानंतर पाच वर्ष कोणीच त्याकडे फिरकत नाहीत त्यामुळे या रस्त्याच्या संपर्कातील गावातील जनतेच्या मनात खूप रोष भरला आहे. खासदारांना हे गावं आहेत हे देखील माहित नसेल अशी खंत व्यक्त होत आहे. रस्ता गाव विकास आणि रस्ते प्रधिनिकरण विभागाकडे आणि स्थानीक लोकं प्रतिनिधी यांच्या कडे अनेक वेळा या विषयाआधारीत लेखी तक्रार करुन सुद्धा हा रस्ता अजून बिकट परिस्थितीत आहे. तसेच पावसाळ्यात खराब रस्त्यामुळे तब्बल तीन महिने एसटी बस सेवा पूर्णतः बंद असते. त्यावेळी येणाऱ्या अडचणी आणि प्रवासासाठी बरेच हाल अपेष्ठा सहन कराव्या लागत. प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटने जोडली जावी असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते परंतु हिकडे अजून हि मोबाईलला सुद्धा नेट नाही तर आजच्या ह्या युगात कठीण परिस्थितीत संपर्क करणे सुद्धा कठीण आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी कडून मिरवणे-गुढे कोंडवी मार्गे कळंबट या रस्त्याचे लवकरात लवकर आणि चांगल्या प्रतीचे डांबरीकरण करून मिळेल आणि कायमचा दिलासा मिळेल म्हणून येथील स्थानिक नागरिक आज ही याच अपेक्षेत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page