ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) भिवंडी येथील योगेश्वर एम्प्लांट्स (आय ) प्रा. लि. कंपनीमधील कामगारांचे वेतन थकविणे तसेच बेकायदेशीर रित्या कामगारांना कामावर घेण्यास मज्जाव करणे. याबाबत महाराष्ट्र जनरल श्रमिक कामगार संघाचे सरचिटणीस श्री. सुप्रिम सुर्वे, उपाध्यक्ष श्री. वैभव विरकर, खजिनदार श्री. विलासराव कदम , चिटणीस श्री. जयानंद सावंत, कार्यकारिणी सदस्य श्री. गणेश भोईर यांनी कामगारांसमवेत कंपनीच्या ठिकाणी धडक देऊन कामगारांचे वेतन व सुट्टीच्या रजेचे वेतन देण्यास कंपनीव्यवस्थापनाला भाग पाडले. तसेच कंपनीचे मालक तुषार पंड्या यांनी इतर कामगारांच्या मागण्यांबाबत सोमवार दि. २६/०३/२०२३ रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन संघटनेस दिले. ही कामगार संघटना गेले १२ वर्ष विविध प्रकारच्या माथाडी व जनरल कामगारांच्या न्याय व हक्कासाठी लढा देत असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.