सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात जोरदार निदर्शनं करून फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सोलापूरमध्ये भीम आर्मीकडून देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून हत्येचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून हत्येचा प्रयत्न केला गेला आहे. त्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, संबंधित पोलीस अधिकारी, हेड कॉन्स्टेबल यांच्यासह आरोपी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली आहे.
याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती दखल घेतली गेली नसल्याने त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील ज्या पिडीतेवर अतिप्रसंग झाला आहे. तिच्या उदर निर्वाहासाठी ५० लाख रुपये शासनाने रक्कम देण्याची मागणी भीम आर्मी संघटनेकडून करण्यात आली आहे
.