मोठी बातमी : माहीमच्या दर्गा ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल ; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मॅरिटाईम बोर्डाला जाग

Spread the love

मुंबई : माहीम दर्गा ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं आहे. पालिकेचे अनेक कामगार आणि जेसीबी देखील माहीमच्या किनाऱ्यावर आणण्यात आलं आहे. दरम्यान, माहीममधील वादग्रस्त मजारीबद्दल सूत्रांनी एबीपी माझाला महत्त्वाची माहिती दिली आहे. कबर खूप जुनी असून, तिची नोंदही करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात मजारीभोवती अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. केवळ हेच बांधकाम आज पाडण्यात येणार आहे. मजारीला हात लावला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

माहीम समुद्रातील कथित मजारीचं मॅपिंग करण्यात आलं  आहे.  महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाचे अधिकारी माहीम समुद्रातील ठिकाणावर पोहोचले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मॅरिटाईम बोर्डाला जाग आल्याचे बोलले जात आहे. माहीमच्या वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं आहे. तसेच एक जेसीबी देखील त्या ठिकाणी तयार ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, माहीम समुद्रामधील या ठिकाणावर माहीम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा केला आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले….

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल झालेल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात खळबळजनक दावा केला आहे. माहीमजवळ समुद्रात अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीरपणे दाखवला. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृ दर्ग्यावर कारवाई करावी, अशी थेट मागणी राज ठाकरेंनी केलीय. ही मागणी करताना, राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला आहे. जर हा दर्गा हटवला नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशारा राज  ठाकरे यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page