
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम दर्गा येथे समुद्रात नवीन हाजी अली तयार करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. माहीम समुद्रात अनधिकृतपणे जागा बळकावून कबर तयार करण्यात आली आहे. तिथे दर्गा तयार करण्यात येत असून आजूबाजूला अनधिकृत बांधकामही करण्यात आल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या जागेची पाहणी केली. तर मगदूम शाह बाबा दर्गाहचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी राज ठाकरे यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. राज ठाकरे म्हणतात त्या जागेवर दर्गा नाही. कबरही नाही. तिथे एक बैठक आहे. ती बैठक ६०० वर्ष जुनी आहे. तसेच ती वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृतही आहे,

ही ६०० वर्ष जुनी बैठक आहे. वक्फ बोर्डाने त्याची नोंदणीही केलेली आहे. राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंब धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. माहीम दर्ग्यातही ते येऊन गेलेले आहेत. त्याच्या बाजूला अनधिकृत बांधकाम असेल तर त्यावर कारवाई केली पाहिजे. आम्ही अनधिकृत बांधकामाचं समर्थन करणार नाही. कोणतीही संस्था हे बांधकाम तोडायला येणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. या बैठकीच्या आजूबाजूला जर अनधिकृत बांधकाम तोडायचं असेल तर आम्ही त्याला सहकार्य करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळी बांधकाम तोडणार?
दरम्यान, या दर्ग्या भोवतीचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जणांचं पथक तयार केलं आहे. हे पथक आज सकाळी ८ वाजता माहीमच्या खाडीत जाऊन त्या जागेची पाहणी करेल. त्यानंतर अनधिकृत बांधकाम तोडलं जाईल. हे बांधकाम तोडण्यासाठी महापालिका पोलिसांची मदत घेईल. वरिष्ठ पोलीस अधिकारी या जागेची पडताळणी करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्याच्या अख्त्यारीत जागा आहे. पोलीस आणि जिल्हाधिकारी दोघेही पाहणी करणार आहेत. अनधिकृत बांधकाम असेल तर पाडले जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा