
दापोली : दापोली-मंडणगडमध्ये मंगळवारी दिवसा दोन वेळा पाऊस बरसला. या बरसलेल्या अवकाळी पावसाने सर्वांची दाणादाण उडवली. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले.दापोली तालुक्यात समुद्र किनारपट्टी भागासह सर्वत्र कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस बरसला.उत्तर रत्नागिरी पाठोपाठ आता अवकाळी पावसाचे रत्नागिरी तालुक्यात सुद्धा मंगळवारी संध्याकाळी आगमन झाले. तालुक्यातील खंडाळा ,पन्हळी ,वाटद ,सैतवडे ,जांभारी ,कासारी,कचरे ,वरवडे या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला.