कर्जत : प्रतिनिधी (सुमित क्षिरसागर) माथेरानमधील गटारांमध्ये पडलेले पेव्हर ब्लॉक उचलून मोकळे करावे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण : माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत आक्रमक
माथेरान शहरात धूळ विरहित रस्ते बनविले जात आहेत. दस्तुरी ते माथेरान बाजारपेठ आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात क्ले पेव्हर ब्लॉक पासून रस्ते बनविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी या रस्त्यावर पूर्वी लावण्यात आलेले सिमेंट पेव्हर ब्लॉक काढण्यात आले आहेत. ते सर्व सिमेंट पेव्हर बाजारपेठ भागात गटारांमध्ये टाकण्यात आले आहेत. त्यामुळे ते सर्व सिमेंट पेव्हर ब्लॉक गटारांमधून काढून अन्य ठिकाणी ढीग मारून ठेवावेत अशी मागणी केली पत्राद्वारे माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेला निवेदन दिले आहे.
ज्यांच्या काळात माथेरान मध्ये धूळ विरहित रस्त्यांची कामे सुरु झाली त्या माथेरान पालिकेच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी रस्त्याच्या बाजूला गटारामध्ये पडलेले सिमेंट पेव्हर ब्लॉक बद्दल लेखी पत्र व्यवहार पालिकेकडे केला आहे. माथेरान मधील मुख्य रस्ता असलेल्या दस्तुरी नाका ते माथेरान शिवाजी महाराज चौक आणि वाचनालय समोर गटारामध्ये सिमेंटचे ब्लॉक पडीक अवस्थेत आहेत, तसेच आपल्या नगर परिषदेकडून रस्त्यावर लावण्यात आलेले सिमेंट पेव्हर ब्लॉक काढण्यात आले आहेत. त्या ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या महात्मा गांधी मुख्य रस्त्यालगतच्या गटारामध्ये रस्त्यावरील जुने पेव्हर ब्लॉक काढून ते ब्लॉक गटारामध्ये डंप करून ठेवले जात आहेत. सध्याच्या स्थितीला अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे पाण्याचा गटारातून निचरा व्यवस्थित होत नाही. तर त्याचा परिणाम मुख्य रस्त्यावरून होऊन रस्त्यालगतच्या दुकानात किंवा घरामध्ये पाणी घुसून नुकसान व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
त्यामुळे सदरचे ब्लॉक नागरी वस्तीतील बहुतेक ठिकाणचे खराब झालेल्या ब्लॉकच्या ठिकाणी त्यांची वाहतूक करून तात्काळ लावून घ्यावे, अशी सूचना आपल्याला वारंवार केलेल्या आहेत. त्यात रस्त्यावरील ठेवलेले अनेक ब्लॉक हे चोरीला देखील गेले आहेत त्यामुळे पालिकेचे तसेच सामान्य नागरिकांच्या आर्थिक कराची देखील नुकसान होत आहे. वारंवार अभियंता, बांधकाम विभागाकडे सदर बाबतीत योग्य नियोजन करावे यासाठी आपल्या नगरपरिषदला वेळोवेळी सूचना केल्या होत्या परंतु अद्याप आपल्या नगरपरिषद प्रशासनाकडुन याबाबतीत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी येणार्या काही दिवसात सदरील ब्लॉक गटारातून उचलून नागरिकांना आणि पर्यटकांना होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रेरणा प्रसाद सावंत निवेदनाद्वारे नगरपरिषद अभियंता यांच्याकडे मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा