मुंबई : काही दिवसांपूर्वा वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज दिलेलं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून वरळीतून आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं. पण आता आदित्य ठाकरे यांनाच भविष्यात वरळी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आमदारकीला निवडून येण्यासाठी मनसेकडून चॅलेंज दिलं जाऊ शकतं. आदित्य ठाकरे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून रणनीती आखण्यात आलेली. पण आगामी निवडणुकीत तसं काही होण्याची शक्यता कमी आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरेंना भाजप-शिवसेनेचं कडवं आव्हान असणार आहेच, याशिवाय मनसेचं देखील कडवं आव्हान राहण्याची शक्यता आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे आगामी विधानसभा निवडणुकीत थेट वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत राज ठाकरेंनी आदेश दिल्यास वरळी काय, मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवेन, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
जाहिरात