
खेड : काही दिवसांपासून राज्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल आहे. अशातच राज्यातील सरकार पडलं याला सर्वस्वी उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याची टीका शिंदे गटातील मंत्र्यांनी केली आहे.तर आजच्या खेडमधील सभेच्या आधी मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो ही चूक झाली. मुंबईत गेल्यावर चूक दुरुस्त करतो, अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय. दीपक केसरकर यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीतील खेडमधील सभेपूर्वीच दीपक केसरकर यांनी हा दावा केला आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची आघाडी तोडा हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत होतो. आम्ही फसवलं नाही. तुम्हीच आम्हाला सांगितलं, तुम्ही निघून जा. आणि आता जनतेला खोटं सांगत आहात. खोटं तरी बोलू नका. तुम्ही स्वत: पंतप्रधानांसमोर कबुल केलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याची तुमच्याकडून चूक झाली. हिंदुत्वाचा विचार सोडण्याची चूक झाली आहे असं यावेळी केसरकर म्हणाले आहेततर पुढे केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्याबरोबर मी चूक दुरुस्त करेन, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी देऊन दिल्लीतून परत आले. पण इथं आल्यावर तुम्ही शब्द मोडलेला असेल तर कोणी कुणाला फसवलं हे राज्यातील जनतेला समजलं पाहिजे, असा खळबळजनक गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
जाहिरात
