
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे गावात डिंगणी-संगमेश्वर मुख्य रस्त्यालगत जेसीबीच्या सहाय्याने उभा डोंगर कापून मोठ्या प्रमाणात मातीसह काळा दगड उत्तखन्न केला जात आहे. गेले आठ ते दहा दिवस खुलेआम उत्खनन सुरू असताना स्थानिक महसूल प्रशासन मात्र जाणीवपूर्वक बघ्याच्या भूमिकेत वावरत असल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण होऊन चर्चेलाही उधाण आले होते. मात्र बघ्याची भूमिका घेऊन वावरणाऱ्या स्थानिक महसूल पर्यंत पत्रकारांनी या उत्खनन केलेल्या ठिकाणचे फोटो घेतल्याची चर्चा पोहचल्यानंतर घाईगडबडीतच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा केला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता कारवाई होणार की नुसता पंचनाम्याचा फार्स केला जात आहे या बाबतही आता चर्चा रंगू लागल्या असून जिल्हाधिकारी यांनी या कारभाराची दखल घेण्याची मागणीही होऊ लागली आहे.

पंचनाम्यानंतर कारवाई होणार की, हा फक्त फार्स; स्थानिकांमध्ये चर्चा
असुर्डे महसूल हद्दीत संगमेश्वर-डिंगणी मुख्य रस्त्यालगत लागून असलेला उभा डोंगर कापून मोठ्या प्रमाणात माती तसेच काळा दगड उत्खन्न जेसीबी ने गेले आठ ते दहा दिवस केले जात आहे. उत्खनन केलेल्या दगड मातीचे ढिगारे व राजरोस सुरू असलेले उत्खनन परीसरातील जनतेला दिसत असताना संबंधित प्रशासनाला का दिसू नये. उभा डोंगर कापून उत्खन्न केले जात आहे, खनिकर्म विभागाची परवानगी घेतली? शासनाचे सर्व नियम डावलून? कोणाच्या तरी चिडीचूप आशीर्वादाने हे केले जात असल्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
कार्यवाहीकडे पाठ फिरवणाऱ्या स्थानिक तलाठी आणि मंडलाअधिकारी यांनी पंचनामा केला असून आता कारवाई होणार की संगनमत अशी शंका चर्चतून व्यक्त केली जात असून जिल्हाधिकारी यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी आता स्थानिक जनता करू लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
