आंबिवली,एकसल व माणगाव, बेकरे तसेच एकसल रस्त्याची दुरवस्था !

Spread the love

महेश भगत यांचा उपोषणाचा इशारा तर आ. थोरवे यांचे उपोषण रद्द बाबत विनंती पत्र.

कर्जत : – कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात येत असलेल्या आंबिवली ते एकसल व माणगाव, रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक वर्षे डांबर पडलेली नसल्यामुळे मात्र स्थानिकांना खड्डेमय व धुळीच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. या सर्व रस्त्याचे नव्याने  डांबरीकरण व्हावे यासाठी आंबिवली गावातील स्थानिक  तरुण महेश भगत यांनी सार्वजनिक विभाग व रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. मात्र याकडे संबंधित विभागाकडून ठोस उत्तर मिळत नसल्याने थेट उपोषणाचा इशारा दिला आहे.

कर्जत – कल्याण या राज्यमार्गापासून साधारण अंदाजे एक ते दिड कि.मी. अंतरावर वसलेले आंबिवली, माणगांव, बेकरे या गावांत येणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मागील अनेक वर्षापासुन या गावांतील रस्ते नव्याने बनविण्यात आलेले नाहीत. मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्ठी मुळे सदर रस्त्यांना अनेक ठीकाणी खांडी पडल्या असून रस्ते खचलेल्या व खड्डेमय परस्थित मध्ये आहेत. व रस्त्यात टाकलेल्या मोऱ्यांना देखील मोठ मोठे ठिगळे पडले असल्यामुळे सदर रस्त्यांवरून  प्रवास करणाऱ्या नागरीकांना व वाहन चालकांना प्रवासा दरम्यान तारेवरची कसरत करत नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर खराब रस्त्याने सतत प्रवास करत आलेल्या वाहनांना देखली त्याची झल बसत आहे. तर आंबिवली गावाकडे येत असलेल्या रस्त्याचा वापर गावाला लागून असलेल्या कुंभे व  एकसळ या गावाकडे जाणारे नागरीक देखील याच रस्त्याचा वापर करतात. तर  बेकरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर हा  आसल पाडा या गावाचे नागरीक करतात.

आंबिवली – माणगांव – बेकरे गावात येणारा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी ही आंबिवली गावातील तरुण कार्यकर्ते महेश भगत यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे  ऑक्टोबर २०२२ पासून लेखी पत्र व्यवहार करून पाठपुरावा सुरु केला आहे. तर आपल्या अर्जाचा विचार करुन लवकरात लवकर कर्जत- कल्याण राज्यार्गापासुन आंबिवली-माणगांव- बेकरे गावात येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करावे अशी मागणी देखील केली आहे. मात्र या संदर्भात ठोस असे उत्तर मिळत नसल्यामुळे सदर तिन्ही गावांकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले नाहीत तर २० मार्च पासून महेश भगत हे कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील माणगाव एसटी स्थानक येथे उपोषणाला बसणार असल्याचा मात्र थेट इशारा दीला आहे. या संदर्भात तर भगत हे कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील माणगाव एसटी स्थानक येथे उपोषणाला बसणार आहेत.

या संदर्भात कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे निवेदन देऊन लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तर सदर निवेदनानुसार मार्च अर्थ संकल्प २०२३ ग्रामीण मार्गामध्ये बेकरे ते बेकरे पाडा रस्ता तयार करणे ग्रा. मा.१४५ रक्कम रुपये २०.०० लक्ष, राज्य मार्ग ते माणगाव तर्फे वरेडी – बेकरे ते राज्यमार्ग ग्रा. मा.८ सा. क्र १/०० ते २/५०० ते ३/५०० ते ४/०० रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण रक्कम रूपये ७० लक्ष अशी दोन कामे तसेच जिल्हा नियोजन सन. २०२२- २३ अंतर्गत रा. मा ७९ ते बेकरे गावाकडे जाणारा रस्ता तयार करणे ग्रा.मा.९ रक्कम रूपये २०.०० लक्ष अशी एकूण तीन कामे मंजूर झाली असल्याचे व सदर रस्ता तयार करण्यासाठीची प्रकिया सुरू असुन, लवकरात लवकर रस्त्याची कामे पूर्ण होतील, तरी आपले २० मार्च रोजीचे उपोषण हे रद्द करण्यासंदर्भातील विनंतीचे लेखी  पत्र हे कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या कडून उपोषणास बसणारे महेश भगत यांना देण्यात आलेआहे.

  सुमित क्षीरसागर  कर्जत

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page