
सातारा : साताऱ्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने शंभूराज देसाईंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण जखमी आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम यांनी पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यात हा गोळीबार केला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी आहे.

या गोळीबारामागचे नेमके कारण समोर आलेले नाही. परंतु, पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिकांनी मदन कदम यांच्या घराभोवती वेढा दिला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा