
रत्नागिरी : मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे आज एक दिवसाच्या रत्नागिरी दौरावर आगमन झाले. खेड येथील भरणे नाका भागातील हेलिपॅडवर यांचे आगमन झाले त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, तसेच आमदार योगेश कदम जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, कोकण परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय मोहिते, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.
