
मुंबई : संपूर्ण देशात वादग्रस्त विधानामुळे परिचित असलेल्या बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्री महाराज यांचा मीरा रोड येथे मुंबई कार्यक्रम होणार आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे. जोरदार तयारी या कार्यक्रमासाठी सुरू असून बागेश्वर बाबा देखील मुंबई दाखल झाले आहे. त्यांना चोख पोलिस बंदोबस्तात सभेस्थळी घेऊन जाणार आहे. यापूर्वी पोलिसांनी आयोजकांना नोटिसही बजावली आहे. कुठला अनुचित प्रकार घडल्यास त्यास संपूर्ण जबाबदारी ही आयोजकांची असेल असा नोटिसमधून एकप्रकारे इशारा देण्यात असला तरी दुसरीकडे बागेश्वर बाबाला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराजांच्या विषय अत्यंत चुकीचे विधान केले होते, त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली होती. या बागेश्वर बाबाच्या विधानाचा निषेध राज्यातील जनतेने केला होता. त्यामुळे बागेश्वर बाबाच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
शिंदे आणि फडणवीस सरकार राज्यामध्ये आल्यापासून हे सरकार संतांच्या आणि शिवाजी महाराजांच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे, गोरगरिबांचे, सामान्य जनतेचे सरकार आहे हे सतत माननीय मुख्यमंत्री सांगत आहे असे सचिन खरात यांनी म्हंटलं आहे.
