मुंबई : अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले. जरी अमृतावहिनींनी यासंदर्भात आता एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण हे प्रकरण गंभीर आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटानं सामना अग्रलेखातून दिली आहे
अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला असून डिझायनर अनीक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.