सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे बुलंद नेतृत्व डॉ. निलेश नारायणराव राणे. – योगेश अरविंद मुळे.

Spread the love

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मा. नारायणराव राणे यांचे सुपुत्र, माजी खासदार आणि कोकण भाजपामध्ये चैतन्य निर्माण करणारे नेते मा. निलेशदादा राणे यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा! निलेशदादांना निरामय दीर्घायुष्य लाभावे आणि कोकणाला अपेक्षित असणारा विकास त्यांच्या नेतृत्त्वाखाली झपाट्याने व्हावा यासाठी त्यांना अपेक्षित सुयश लाभो हीच आई श्री शांतादुर्गाचरणी कामना…

🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | मार्च १७, २०२३.

🔴 डॉ. निलेश नारायण राणे यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याचा वारसा त्यांचे वडील ना. नारायणराव राणे साहेबांकडून लाभला. आक्रमक स्वभाव आणि कामाचा वेग असल्याने त्यातच लोभस व्यक्तिमत्त्वाचे धनी असल्याने निलेश दादा युवकांच्या गळ्यातील ताईत झाले. अतिशय हुशार आणि हजरजबाबी असणाऱ्या निलेशदादांनी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमाल करत विजय मिळवला आणि पुढील ५ वर्षांत स्वतःचे एक वेगळे अस्तित्त्व सिद्ध केले. या काळात त्यांनी उपलब्ध संसाधने आणि प्रसारमाध्यमे यांचा अत्यंत सुयोग्य वापर करत दुर्गम भाग मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यामुळे लोकांनी त्यांचे नेतृत्त्व मान्य केले. निलेशदादांची प्रशासनावरील पकड आणि जरब इतकी होती की या कालखंडात त्यांच्या माध्यमातून आलेले काम तातडीने पूर्ण झालेच पाहिजे याची लोकांना खात्री होती. मागील साडेआठ वर्षे ते खासदार नसूनही प्रशासन त्यांच्या शब्दाचा मान राखते हे त्यांचे कौशल्य आहे.

🔴 कार्यकर्ता किंवा अडचणीमध्ये असलेला कोणताही नागरिक त्यांच्याकडे आल्यास त्यांची अडचण तत्परतेने दूर करण्यासाठी आवश्यक असणारे सहकार्य डॉ. निलेश राणे नेहमीच करतात, असे अनेक कार्यकर्ते आणि लाभार्थी आपला अनुभव सांगतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात सर्वपक्षीय नेत्यांप्रमाणेच त्यांचे योगदान अमुल्य आहे. आक्रमक अंदाज आणि रोखठोक भूमिका मांडण्याचा स्वभाव या त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी अतिशय संवेदनशील आणि हळवे व्यक्तिमत्त्व असल्याचे स्वतः मी पाहिले आहे. देवरुख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयात एका कार्यक्रमानिमित्त ते आले असताना एक आजीबाई (ज्या पूर्वी जनसंघाच्या कार्यकर्त्या होत्या) निलेश दादांना भेटायला आल्या. अतिशय व्यस्त कार्यक्रम असतानाही जवळपास १० ते १२ मिनिटे निलेश दादा त्यांच्याशी गप्पा मारत उभे होते. आजीबाई निघताना चेहऱ्यावर समाधान घेऊन बाहेर पडल्या. हा संवेदनशील आणि नम्रपणा मी जवळून अनुभवला होता.

🔴 आपला कार्यकर्ता कणखर आणि विजीगिषु वृत्तीचा व्हावा, जिंकण्याची इर्षा त्याच्या नसानसांत संचारावी आणि यामाध्यमातून पक्ष बळकट व्हावा याकरीता कटाक्षाने प्रयत्न करणारे डॉ. निलेश राणे प्रत्येक भाषण आवेशपूर्ण करतात. त्यामुळे त्यांच्यासमोर बसणारा प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठतो. ही त्यांची खासियत कोकणात काही ठराविक नेते सोडल्यास अन्य कुणाकडे नाही. आणि यामुळेच त्यांचे प्रत्येक कार्यक्रम पक्षासाठी भरीव योगदान देऊन जातात. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांनी केलेली लोकसेवेची कामे, नैसर्गिक आपत्तींच्या काळात सर्वसामान्यांना दिलेला मदतीचा हात सारेच अजोड आहे. कोकणात रिफायनरीबाबत सकारात्मक आणि नकारात्मक मतप्रवाह आहेत. “रिफायनरी पर्यावरणाच्या दृष्टीने निकोप आहे” या गोष्टीची खात्री पटेपर्यंत निलेशदादांनी रिफायनरी विरोधात भूमिका मांडली. मात्र सखोल अभ्यास आणि अशाच प्रकारच्या इतर रिफायनरींची माहिती मिळवून त्यांनी सत्यासत्यता तपासून पाहिली. यातून कोकणचा आणि कोकणी माणसाचा होणारा सर्वांगीण विकास त्यांनी जाणून घेतला आणि त्यानंतर त्यांनी रीफायनरीच्या समर्थनार्थ पवित्रा घेतला. केवळ राणेंनी रिफायनरीचे समर्थन केले म्हणून अनेकांनी आपला विरोध मागे घेतला. ही ताकद, ही लोकप्रियता आणि असा विश्वास कोकणात डॉ. निलेश राणेंनी संपादित केला आहे. याच त्रिसूत्रीच्या आधारे निलेश नारायण राणे हे नाव पुन्हा एकदा EVM मशीनवर लोकसभेच्या निमित्ताने आल्यास विरोधकांच्या हातात केवळ पराभव येणार हे २०२४ चे शाश्वत सत्य आहे. यासाठी कोण्या ज्योतिषाने भाकीत वर्तवण्याची आवश्यकता नाही. डॉ. निलेश राणेंसारख्या तडफदार सेनापतीच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता मा. नरेंद्र मोदीजींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी अभिषिक्त करण्यासाठी उत्सुक आहे.

🔴 निलेश दादा, आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी भावना व्यक्त केल्या. आपल्या समाजकार्याचा आणि राजकीय कारकीर्दीचा लौकिक दिगंतात पसरो याच वाढदिवसाच्या सदिच्छा!

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page