
मुंबई : शिंदे आणि ठाकरे यांचे आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे आता महाराष्ट्राला नवीन राहिलेले नाहीत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.त्यांनी शिंदे यांना मख्खमंत्री म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला आहे. राऊत म्हणाले, “या राज्याला मुख्यमंत्री नाहीत. या राज्याला मख्खमंत्री आहेत. मुख्यमंत्री असते, तर राज्याची अशी अवस्था झाली नसती. सगळी सूत्रं सध्या उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. मुख्यमंत्री फक्त ४० खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करतायत. बाकी काही करत नाहीयेत.