सर्दी-खोकला अंगावर काढू नका, खोकला असेल तर मास्क वापरण्याचा सल्लाही सरकारने दिला

Spread the love

मुंबई : ज्यात एच3एन2 एन्फ्ल्युएन्झा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवनात यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.सर्दी-खोकला अंगावर काढू नका अशा सूचना देण्याबरोबरच खोकला असेल तर मास्क वापरण्याचा सल्लाही सरकारने दिला आहे. या आजारासंदर्भात जनजागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

राज्यात आढळलेले एच3एन2 एन्फ्ल्युएन्झाचे रुग्ण, या आजारामुळे झालेले मृत्यू, आरोग्य यंत्रणेची तयारी, सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन व औषधांची उपलब्धता, डॉक्टरांची संख्या यासंदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. या आजाराची लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्याचप्रमाणे रुग्णाच्या सहवासात असलेल्या व्यक्तींमध्ये दहा दिवसांत या आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करावेत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सहआयुक्त संजय कुमार, वैद्यकीय शिक्षण सचिव अश्विनी जोशी, सचिव डॉ. नवीन सोना, आरोग्य आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उपचार करण्यात अडचण येऊ नये यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी आणि आवश्यकता वाटल्यास खासगी कंत्राटी कर्मचारी नेमून उपचाराचे काम सुरू ठेवावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page