ग्रहांच्या संक्रमाणामुळे वेळोवेळी शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रह गोचरचा मानवी जीवनाच्या आयुष्यावर परिणाम होतो. मीन राशीतील गुरू आणि चंद्र यांच्या संयोगाने गजकेसरी राजयोग तयार होतो. हिंदू नववर्षाला म्हणजेच 22 मार्चला हा गजकेसरी राजयोग तयार होतो आहे. यामुळे 3 राशींना मोठ्या फायदा होणार आहे. त्यांना अपार संपत्ती मिळणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
कर्क (Cancer)
गजकेसरी राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे नशीब पलटणार आहे. हा योग कुंडलीतील नवव्या घरात तयार होतं आहे. त्यामुळे या लोकांना परदेशी दौऱ्याचे योग आहे. विद्यार्थ्यांसाठी हा योग भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात भरभरून यश मिळणार आहे. शिवाय अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत.
धनु (Sagittarius)
गजकेसरी राजयोग या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कुंडलीमध्ये दुसऱ्या घरात हा योग तयार होत आहे. हे घर धनसंपत्तीचं असल्याने या लोकांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी योग वेळ आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हा योग खास करुन मीडिया, फिल्म लाईन, मार्केटिंग वर्कर्ससाठी फलदायी ठरणार आहे.
मीन (Pisces)
गजकेसरी राजयोग या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. तुमचं व्यक्तिमत्व समाजात चमकणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार असल्याने प्रत्येक कामात यश मिळणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तुम्हाला या योगामुळे धनलाभ होणार आहे. हा काळ तुमच्या करिअर आणि आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरणार आहे.
वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे