
खेड : मुंबई-गोवा महामार्गवर अवकाळी पावसाची जोरदार सरी पडल्यानंतर एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरली असल्याची घटना दुपारी ४ च्या सुमारास घडली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. बस बाहेर काढण्यात आल्या नंतर मुंबईकडे मार्गस्त करण्यात आली.
गुरुवारी दुपारी पावसाच्या सरीने महामार्ग वाहनाचा वेगही मंदावला होता. दुपारी चारनंतर खेड आगराची पन्हाळजे मुंबई बस कशेडी घाट उतरून पोलादपूर काटेतली फाटा जवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला गटार लगत घसरली या बसमध्ये २५ च्या आसपास प्रवासी होते. यातील कोणालाही दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
या अपघाताची माहिती मिळताच बस पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने मुख्य मार्गवर काढण्यात आल्यानंतर मुंबई कडे मार्गस्त करण्यात आली.