रत्नागिरी : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील आंजणारी ता.लांजा येथील घाटीमधील तीव्र उतारावर तेलाने भरलेला टँकर उलटून महामार्गावर तेल गळती झाली आहे.
महामार्गावर घडलेल्या या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्ग पोलीस तसेच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे गंभीर जखमी चालकाला लांजा येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले आहे. टँकर मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जात होता.