पुणे : पुणे सहकार आयुक्त कार्यालय पुणे येथे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी महाराष्ट्र राज्य पत संस्था फेडरेशन चे कार्याध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन “अर्थात “हा ग्रंथ देऊन केले व राज्य फेडरेशन च्या माध्यमातून राज्यातील पत संस्थांना तुमच्या प्रदीर्घ अनुभवातून नेतृत्व द्या अश्या शुभेच्छा दिल्या. आर्थिक शिस्त ,स्पर्धात्मक युगातील आव्हान, नवीन तंत्रज्ञान या सर्वाचा सामना करत पत संस्था जगत द्रुतगतीने पुढे जात असताना सहकार खाते व राज्य फेडरेशन यांच्यात समन्वय रखण्या साठी काम करा असे आवाहन अनिल कवडे यांनी केले.
या प्रसंगी सहकार खात्यातील अधिकारी श्री शैलेश कोथमिरे, अप्पर आयुक्त श्री ज्ञानदेव मुकणे. राज्य फेडरेशन चे उपाध्यक्ष डॉ. शिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, उपनिबंधक श्री सोबाळे उपनिबंधक श्री राम कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पत संस्थांना लागू करावयाच्या अवंशदान ठेव सवरक्षणाची कार्यपद्धती या बाबत विस्तृत चर्चा झाली. सहकार खात्याने या बाबत केलेले प्रेझेंटेशन चे सांदरीकरण या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त कोथमिरे यांनी या वेळी केले.
पत संस्था चालकांना ही योजना माहित होण्याची गरज लक्षात घेऊन पत संस्था न पर्यंत हा विषय पोचवावा लागेल पत संस्था चालकांच्या मनात असलेल्या शंका या तपशीलवार प्रेझेन्टेशन मुळे दूर होतील असे ॲड. दीपक पटवर्धन या बैठकी अंती म्हणाले.