
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून वेगवेगळ्या कारणांसाठी नेमण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्तासाठी नाविन्यपूर्ण अशा “बंदोबस्त ॲप”ची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात प्रथमच रत्नागिरी पोलिस दलाकडून अशा ॲपची निर्मिती आणि वापर करण्यात येत आहे.या ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत 27 महत्वाचे व अतिमहत्वाचे बंदोबस्त नेमून प्रभावी व परिणामकारक वापर करण्यात आलेला आहे.बंदोबस्ताचे नियोजन अधिक सुसूत्र,शिस्तबध्द व परिणामकारक करण्यासाठी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रभावी नियंत्रण ठेवता यासाठी हे ॲप महत्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात साजरे होणारे विविध सण,मोहोत्सव, महत्वाचे आनंदोत्सव,सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महत्वाच्या,अतिमहत्वाच्या व्यक्तिंच्या हालचाली दरम्यान,राबवण्यात येणारी विविध अभियाने तसचे इतर महत्वाच्या दिनांनिमित्त पोलिस ठाणे व जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त नेमण्यात येतो.“बंदोबस्त ॲप” मधील विशेष बाब म्हणजे, सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना डिजिटल पध्दतीने बंदोबस्त पॉईंट व कर्तव्याची नेमणूक याव्दारे करता येते. तसेच ॲपव्दारे आपले देण्यात आलेले कर्तव्य ठिकाण पाहणे व ऑनलाईन हजेरी नोंदवण्याची सुविधा यामध्ये देण्यात आलेली आहे. तसेच जर पोलिस अधिकारी-अंमलदार हे त्यांना नेमण्यात आलेल्या बंदोबस्त पॉईंट (बंदोबस्तचे ठिकाण) सोडून इतरत्र ठिकाणी गेल्यास त्याबाबतचा अलर्ट मेसेज वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांना या ॲपच्या माध्यमातून लागलीच प्राप्त होतो. व त्यामुळे बंदोबस्तावर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे नियंत्रण राहते व बंदोबस्तामध्ये सुसूत्रता तसेच बंदोबस्त अधिक प्रभावी व परिणामकारक होत असल्याचे बगाटे यांनी सांगितले.
बंदोबस्त ॲपचा वापर हा नेमण्यात आलेल्या बंदोबस्त दरम्यान देण्यात येणाऱ्या कर्तव्याकरता करण्यात येत असून रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी “बंदोबस्त ॲप” स्वतःच्या मोबाईलवर डाउनलोड करुन घेतलेले आहे. व त्याचा वापर नियमित करण्यात येत आहे. या “बंदोबस्त ॲप”व्दारे सर्व पोलिस अमंलदार हे बंदोबस्ताच्या वेळी त्यांना नेमण्यात आलेले कर्तव्य हे या ॲपमधून स्वतःची हजेरी नोंदवतात व पोलिस अधिकारी-अंमलदार यांनी बंदोबस्त ॲपमध्ये लॉगीन केल्यानंतर बंदोबस्ताचे ठिकाणी असणारे पोलिस अधिकारी-अंमलदार यांचे जिओ लोकेशन वरिष्ठ प्रभारी पोलिस अधिकारी,पोलिस अधिक्षक, रत्नागिरी यांना लागलीच मॉनिटर करणे सहज शक्य झाले आहे.
“बंदोबस्त ॲप”चे वापरकर्ते
स्वतः पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्यासह 4 पोलिस उपविभागीय अधिकारी,1 पोलिस उपअधिक्षक (पोलिस मुख्यालय),रत्नागिरी,17 पोलिस निरीक्षक,21 सहाय्यक पोलिस निरीक्षक,67 पोलिस उपनिरीक्षक,118 सहाय्यक पोलिस फौजदार,464 पोलिस हवालदार आणि 788 पोलिस नाईक व पोलिस काँस्टेबल असे एकूण 1 हजार 481 जण या “बंदोबस्त ॲप” चा वापर करतात.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*