शिंदे सेनेचे ५, भाजपचा एक सभापतीपद; रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध…

Spread the love

*रत्नागिरी :* रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची मंगळवारी (२० जानेवारी) बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये पाच समित्या शिंदेसेनेकडे तर एक समिती भाजपला देण्यात आली आहे. मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी ही निवड जाहीर केली.शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतीपदी भाजपचे समीर जगन्नाथ तिवरेकर यांची निवड करण्यात आली आहे. पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापतीपदी निमेश विजय नायर, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी संतोष दत्तात्रय कीर यांची निवड करण्यात आली.स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी राकेश चंद्रकांत नागवेकर, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी प्रीती रवींद्र सुर्वे, उपसभापतीपदी पूजा दीपक पवार, नियोजन व विकास समिती सभापतीपदी सुहेल अब्दुल लतीफ साखरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थायी समितीस्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे या आहेत. त्याचबराेबर सदस्यपदी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, निमेश नायर, संतोष कीर, राकेश नागवेकर, प्रीती सुर्वे, सुहेल अब्दुल लतीफ साखरकर या सभापतींसह नगरसेविका मानसी करमरकर, स्मितल पावसकर, दत्तात्रय साळवी यांचा समावेश आहे.

नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला जनतेने काैल दिला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभापतिपदांची निवड करण्यात आली आहे. महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी नगर परिषदेचे कामकाज सर्व नगरसेवक अत्यंत पारदर्शीपणे करतील यात शंका नाही. – बिपिन बंदरकर, शहरप्रमुख, शिंदेसेना.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page