
बदलापूर : बदलापूरमध्ये शिवसेना उप शहरप्रमुख प्रवीण राऊत यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह भाजपात प्रवेश केल्याने शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे.
मागील महिन्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये शिंदे सेनेला मोठा धक्का दिला होता. अंबरनाथ आणि बदलापूरचे नगराध्यक्षपद जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षांकडून एकमेकांना शह-काटशह देणाऱ्या खेळी सुरू झाल्या असून, आज भाजपाने बदलापूरमधील शिंदेसेनेचे उपशहरप्रमुख राऊत यांना भाजपामध्ये घेत शिंदे सेनेला धक्का दिला आहे.
प्रवीण राऊत यांनी शिंदेसेनेकडून नगर परिषदेची निवडणूक लढवली होती. निवडणुकीत पराभव झाला होता. प्रवीण राऊत यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते. निवडणुकीत पराभव झाला असला तरी शिंदेसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपद मिळेल, अशी अपेक्षा राऊत यांना होती, मात्र स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्याने ते नाराज झाले होते. तेव्हापासूनच ते शिंदेसेनेला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
अखेरीस आज प्रवीण राऊत यांनी आज आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. प्रवीण राऊत यांच्यासोबत शिंदेसेनेच्या नगरसेविका दीपाली लामतुरे आणि त्यांच्या पतीनेही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, राजेंद्र घोरपडे, शरद तेली, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, प्रवीण राऊत यांच्यासोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्याने हा बदलापूरमधील शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*