
रत्नागिरी – जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांसाठी महायुतीमधून शिवसेनेच्या उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. आता सोबतच महायुतीमधील भारतीय जनता पक्षासाठी कोणते जिल्हा परिषद गट आणि कोणते पंचायत समिती गण येणार याची स्पष्टता होऊ लागली आहे. भाजपाच्या वाट्याला रत्नागिरी जिल्ह्यात ८ जिल्हा परिषद गट आणि १९ पंचायत समिती गण देण्यात आले आहेत. यामध्ये संगमेश्वरमधील कडवई आणि साडवली, चिपळूणमधील पेढे आणि खेर्डी, गुहागरमधील कोंडकरोळ आणि शृंगारतळी खेडमधील आमडस आणि दापोलीतील बुरोंडी हे जिल्हा परिषद गट भाजपाला देण्यात आले आहेत.
महायुतीमधून शिवसेनेसाठी हातखंबा जि.प. गटासाठी पर्शुराम कदम आणि उत्तम सावंत या दोघांपैकी एकाच नाव निश्चित करण्यात येणार आहे. तर कोतवडे जि.प. गटासाठी राजू साळवी, वाटद जि. प. गट उषा सावंत, नाचणे जि. प. गट प्रकाश रसाळ, कर्ला जि. प. गटासाठी महेंद्र झापडेकर ही नावे समोर आली आहेत.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर