चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या रूपाली दांडेकर यांची बिनविरोध निवड,सौ. शीतल रानडे, फैसल कास्कर, विकी लवेकर स्वीकृत नगरसेवक…

Spread the love

चिपळूण- चिपळूण नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये उपनगराध्यक्षपदी भाजपच्या रूपाली दांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेकडून विक्रांत लवेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून फैसल कासकर आणि भाजपकडून शितल रानडे यांची नियुक्ती करण्यात आली.

सभेच्या सुरुवातीला उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने रूपाली दांडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केली. त्यानंतर स्वीकृत सदस्यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. यानंतर सफा गोठे, उदय जुवळे, अंकुश आवले, रसिका देवळेकर, साजिद सरगुरोह यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विकी नरळकर यांनी मनोगत व्यक्त करताना, “आम्ही उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम करूया. सत्ताधारी व विरोधक असा भेद न ठेवता नगरहितासाठी काम व्हावे,” असे मत व्यक्त केले.

भाजपचे गटनेते शशिकांत मोदी यांनीही मनोगत व्यक्त करताना, “शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात आपल्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. हे आपले भाग्य आहे. कोणतेही हेवेदावे न करता हातात हात घालून सर्वांनी एकदिलाने चांगल्या पद्धतीने काम करूया, असे सांगितले. स्वीकृत सदस्य फैसल कासकर व विक्रांत लवेकर यांनी पक्षाने संधी दिल्याबद्दल आभार मानले. उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांनी, आजपर्यंत मी प्राध्यापक म्हणून काम करत होते, मात्र आता अभ्यासक्रम बदलला आहे. आता लोकांसाठी काम करायचे आहे. आपले कामच बोलणारे असावे, असे सांगितले. शेवटी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मनोगत व्यक्त करताना, एकट्याने स्वप्न पूर्ण होत नाही. सर्वांनी एकत्र येऊन चिपळूण शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी काम करूया. माझे स्वप्न हे आपले सगळ्यांचे स्वप्न झाले आहे.

सत्ताधारी-विरोधक असा भेद राहणार नाही. जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे काम करूया, असे आवाहन केले. या सभेला सर्व नगरसेवकांसह मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, सभा कामकाज लिपिक श्री. संतोष शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर व स्वीकृत नगरसेवकांचे भाजपचे नेते, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे  नेते प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, आ. भास्करशेठ जाधव यांच्या पत्नी सौ. सुवर्णाताई जाधव, माजी नगरसेवक समीर जाधव, शिवसेना उपनेते, मा. आमदार सदानंद चव्हाण यांच्या पत्नी सौ. सीमाताई चव्हाण, माजी नगरसेवक विजय चितळे, माजी नगरसेवक आशिष खातू आदी अनेक मान्यवरानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page