
चिपळूण, मांडकी-पालवण- कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी महाविद्यालयात ‘भारतीय संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
देशाचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले गेले. या दिनाचे महत्त्व तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांनी भारताच्या संविधानाचे पालन करण्याची, देशाची सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याची, तसेच समानता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची जपणूक करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
संविधान दिनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयातील या कार्यक्रमासाठी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम ,जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर