
नितीश कुमार यांचा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडला. त्यांनी दहाव्यांदा शपथ घेत विक्रम रचला आहे.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार…
नितीश कुमार यांनी दहाव्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ…
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह उपस्थित….
बिहार : संपूर्ण देशामध्ये चर्चेत असलेली बिहार विधानसभा निवडणूक (Bihar ELections) पार पडली. यामध्ये एनडीएला घवघवीत यश मिळाले. नितीश कुमार(Nitish Kumar) आणि भाजपची जादू बिहारमध्ये देखील चालली आणि बिहारी जनतेने एनडीए आघाडीला पाठिंबा दर्शवला. भाजप प्रणित आघाडीला मोठं बहुमत मिळालं असून 243 जागांपैकी 202 जागांवर विजय मिळाला आहे. यानंतर आता नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली. त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला असून नितीन कुमार यांच्यासह 26 जणांनी गोपनीयतेची शपथ घेतली.

बिहारमध्ये एनडीए आघाडीमध्ये नितीश कुमार हेच मोठे भाऊ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याबाबत नितीश कुमार यांनी हा विक्रम रचला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहिले आहेत. महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील तिघांची आघाडी राहिली आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असेच त्रिसुत्र बिहारमध्ये राहणार आहे. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा या दोघांकडे उपमुख्यमंत्रीपद राहणार आहे. त्यामुळे बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.


*सरकार स्थापनेमध्ये बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’..*
बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचे बहुमताने सरकार आल्यानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी पार पडला. महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाला महाराष्ट्रात 57 जागा जिंकता आल्या, तर भाजपने 132 जागांवर विजय मिळवला होता. तर अजित पवार गटाने 41 उमेदवारांचा विजय झाला होता. यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपच मोठा ठरला. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची धुरा ही भाजपकडे आली. तर बिहारमध्ये नितीश कुमार हेच गेंमचेंजर ठरले. एनडीएमधील 243 जागांपैकी भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी 101 जागा जिंकल्या आहेत, तर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ने 29, हिंदुस्थानी अवाम मोचनि 6 आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक मोचनि 6 जागा जिंकल्या आहेत.


नितीश कुमार यांच्यासह आणखी इतर नेत्यांनी देखील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे-
विजय चौधरी
बिजेंद्रप्रसाद यादव
श्रवण कुमार
मंगल पांडे
दिलीप कुमार जयस्वाल
अशोक चौधरी
लेशी सिंग
मदन सहानी
नितीन नवीन
रामकृपाल यादव
संतोष कुमार सुमन
सुनील कुमार
मो. जमा खान
संजय सिंग टायगर
अरुण शंकर प्रसाद
सुरेंद्र मेहता
नारायण प्रसाद
रमा निशाद
लखेंद्र कुमार रोशन
श्रेयसी सिंग
डॉ. प्रमोद कुमार
संजय कुमार
संजय कुमार सिंग
दीपक प्रकाश

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर