
सौदी अरेबियातील मदीनाजवळ उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसनं डिझेल टँकरला धडक दिली. या अपघातात हैदराबादमधील ४५ उमरा यात्रेकरुंचा मृत्यू..
मदिना/हैदराबाद- भारतीय उमरा यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसची डिझेल टँकरशी टक्कर झाली. हा अपघात सोमवारी सकाळी मदिनाजवळ झाला. या अपघातात तेलंगणातील हैदराबादमध्ये राहणाऱ्या ४५ जणांचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार बस मक्काहून मदीनाला जात होती. मक्कामधील धार्मिक विधी पूर्ण करून यात्रेकरू पवित्र शहरात जात होते. अपघात झाला तेव्हा सर्व यात्रेकरू झोपेत होते. अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे. स्थानिक रहिवासी गंभीर जखमींना मदत करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांचा नेमका आकडा अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेला नाही. प्राथमिक माहितीनुसार अपघातामध्ये बहुतेक यात्रेकरू हैदराबादचे आहेत. या धडकेमुळे झालेल्या स्फोटाची तीव्रता पाहता अधिक जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
जेद्दाहमधील भारतीय दूतावासानं अपघातामधील सापडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी २४/७ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तसेच हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. या भारतीय दुतावासानं एक्स मीडियावर पोस्ट करत अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं.
परराष्ट्र मंत्र्यांनी काय म्हटलं? – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही तीव्र चिंता व्यक्त करत म्हटलं, सौदी अरेबियातील मदिना येथे भारतीय नागरिकांच्या अपघाताबद्दलची माहिती मिळाल्यानंतर मला खूप धक्का बसला. रियाधमधील आमचे दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास या अपघातात बाधित झालेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना पूर्ण मदत करत आहेत. जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडियात पोस्ट करत खूप दुःख झाल्याची भावना व्यक्त केली. ज्या कुटुंबांनी आपल्या जवळच्या व्यक्तींनागमावले आहे, त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी झालेले सर्व लवकर बरे होण्याची मी प्रार्थना करतो. रियाधमधील दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास सर्वतोपरी मदत करत आहेत. भारतीय अधिकारी सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांशीही संपर्कात आहेत.
सचिवालयात नियंत्रण कक्ष स्थापन-
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सौदी अरेबियामधील भारतीय यात्रेकरूंच्या बस अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. तेलंगणा सरकारनं अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना माहिती आणि मदत देण्यासाठी हैदराबादमध्ये एक नियंत्रण कक्षदेखील स्थापन केला आहे. हैदराबादमधील तेलंगणाचे मुख्य सचिव रामकृष्ण राव यांनी दिल्लीत असलेले निवासी आयुक्त गौरव उप्पल यांना अपघातामधील लोकांची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले.
असदुद्दीन ओवैसी यांचे केंद्र सरकारला मदतीचं आवाहन-
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी सांगितलं की, मक्काहून मदीनाला जाणारे ४२ हज यात्रेकरू बसमध्ये होते. अपघातानंतर त्या बसला आग लागली. कारण त्यांनी या प्राणघातक अपघातानंतर केंद्राकडून त्वरित कारवाईची मागणी केली. केंद्राला मदतीचं आवाहन करताना ओवैसी म्हणाले, मी केंद्र सरकारला, विशेषतः परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना मृतदेह भारतात परत आणण्याची विनंती करतो. जर कोणी जखमी असेल तर त्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, याचीही खात्री करण्याची विनंती करतो.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर