
रत्नागिरी : वाकेड फाटा (ता. लांजा) येथे रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने उडविले. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. स्वप्नील गणपत बराम (वय ४०, रा. वाकेड, ता. लांजा) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १६) सकाळी नऊच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील बराम हे सकाळी आठच्या सुमारास चालत वाटूळ येथे कामाला जात होते. रस्त्यातून जात असताना अज्ञात वाहने त्यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे वडिल गणपत बराम यांनी अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर