
*संगमेश्वर प्रतिनिधी-* मराठी संगीतसृष्टीत नव्या दमाच्या कलाकारांची भर पडत आहे, आणि याच नव्या लाटेतून एक सुंदर आणि भावपूर्ण गाणं तू ” *नभातला चांद माझा”* प्रेक्षकांसमोर आलं आहे. समिक्षा वाडकर हिच्या आवाजात आणि गाण्याचे संगीतकार तसेच गायक आदित्य गुरव यांनी सादर केलेल हे नवं गाणं नुकतंच लोकप्रिय मराठी म्युझिक चॅनेल “9X झकास” वर प्रदर्शित झालं आहे.
या गाण्याचे सुंदर आणि हृदयस्पर्शी शब्द अगस्ती कुमटेकर यांनी लिहिले असून, गाण्यात मुख्य भूमिका बजावली आहे ती म्हणजे रचना कदम आणि कैलाश मेहला. गाण्याचे दिग्दर्शन समीर महाडिक यांनी केले आहे. तसेच गाण्याचे चित्रिकरण प्रणित मालप यांनी केले असून गाण्यात प्रेम, भावना आणि मराठी तरुणाईच्या नाजूक भावविश्वाचा सुंदर संगम दिसून येतो. समिक्षाचा मधुर आणि अभिव्यक्तीपूर्ण आवाज, आदित्य गुरव , तसेच सुंदर संगीत संयोजन यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
“9X झकास” सारख्या प्रतिष्ठित मराठी वाहिनीवर गाण्याची निवड होणं, हे समिक्षा वाडकर साठी मोठं पाऊल ठरलं आहे. संगीतप्रेमी प्रेक्षकांकडून या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावरही या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या आनंदाच्या प्रसंगी समिक्षा वाडकर म्हणाली, “माझं गाणं ‘9X झकास’सारख्या मोठ्या चॅनेलवर झळकलं, ही माझ्यासाठी अविस्मरणीय गोष्ट आहे. गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करतंय, हेच माझं खरं यश आहे. माझ्या आई बाबांचा खंबीर पाठींबा आणि मी माझी टीम यांचे मी आभार मानते — संगीतकार आदित्य गुरव गीतकार अगस्ती कुमटेकर यांचे सुंदर शब्द आणि ‘तू नभातला चांद माझा ‘ ची संपूर्ण टीम यांच्याशिवाय हे शक्य झालं नसतं.”
मराठी संगीतविश्वात नव्या उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवणारा हा यशस्वी टप्पा समिक्षा वाडकरच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर