संपूर्ण देशातील पाणी प्रश्नांबाबत आणि व्यवस्थापनाबाबत काम करण्यासाठी या मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे.
मुंबई,: जल संसाधन मंत्रालय, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयांचं एकत्रिकरण करून 2019मध्ये जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. गेल्या काही दशकांपासून देशाला भेडसावत असलेल्या पाण्यासंबंधीच्या वाढत्या आव्हानांबाबत हे मंत्रालय कार्य करतं. संपूर्ण देशातील पाणी प्रश्नांबाबत आणि व्यवस्थापनाबाबत काम करण्यासाठी या मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. जलशक्ती मंत्रालयानं, जलसंपदा विभागातील नदी विभागांतर्गत अप्पर यमुना रिव्हर बोर्डामध्ये (युवायआरबी) सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट ‘अ’) पदावरील नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. जलशक्ती मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट ‘अ’) पदाची एक जागा रिक्त आहे. या जागेवर प्रतिनियुक्ती मिळालेल्या व्यक्तीला वेतनश्रेणी स्तर 10 नुसार पगार दिला जाईल. ‘स्टडी कॅफे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पोस्टचं नाव आणि संख्या: जलशक्ती मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट ‘अ’) पदासाठी प्रतिनियुक्ती तत्त्वावर फक्त एक जागा रिक्त आहे.
वयोमर्यादा: सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट ‘अ’) पदासाठी अर्ज करणाऱ्यासाठी इच्छुक व्यक्तीचं वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
नोकरीचं ठिकाण आणि कार्यकाळ: या पदासाठी निवड झालेल्या व्यक्तीला दिल्ली येथील मंत्रालयाच्या मुख्यालयात काम करावं लागेल. प्रतिनियुक्तीचा कालावधी साधारणपणे तीन वर्षांपेक्षा जास्त नसेल.
पे स्केल: सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट ‘अ’) पदासाठी नियुक्ती झालेल्या व्यक्तीला वेतनश्रेणी स्तर 10 नुसार 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 रुपये मासिक पगार मिळेल.
पात्रता निकष:
A) केंद्र सरकार/राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील अधिकारी:
मुख्य केडर किंवा डिपार्टमेंटमध्ये कायमस्वरूपी अॅनॉलॉगस पोस्टवर कार्यरत असावा किंवा, पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-8 मधील दोन वर्षांच्या सेवेसह किंवा समतुल्य, पेरेंट केडर किंवा विभागात नियमितपणे नियुक्ती झालेली पाहिजे.
B) खालील शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असला पाहिजे:
I) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची बॅचलर पदवी मिळवलेली असलेली पाहिजे.
II) सिंचन आणि पाणी वापराच्या क्षेत्रात किंवा केंद्र सरकार, राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेशातील प्रशासकीय किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेमध्ये सिंचन प्रकल्पांचं सर्वेक्षण, अन्वेषण, डिझाइन, देखभाल किंवा कामाचा तीन वर्षांचा अनुभव असला पाहिजे.
निवड प्रक्रिया: प्रतिनियुक्तीवर सहाय्यक कार्यकारी अभियंता पदासाठी मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केली जाईल
जलशक्ती मंत्रालयाने 20 फेब्रुवारी 2023 रोजी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये अधिसूचना जारी केल्यापासून 60 दिवसांपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज योग्य चॅनेलद्वारे दिलेल्या पत्त्यावर सबमिट केला पाहिजे. इच्छुक उमेदवारांनी योग्य चॅनेलद्वारे आपली रीतसर स्वाक्षरी केलेला (अॅडव्हान्स कॉपीसह) अर्ज, सदस्य सचिव, अप्पर यमुना रिव्हर बोर्ड, वेस्ट ब्लॉक-1, विंग-4, ग्राउंड फ्लोअर आर. के. पुरम, नवी दिल्ली – 110 066 या पत्त्यावर पाठवला पाहिजे.