
रत्नागिरी : दि १३ नोव्हेंबर- रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ७ या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडणूक लढण्याची संधी मिळाली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी चांगले संघटन असून या परिसरात काम करणारे कार्यकर्ते अतिशय तळमळीने काम करत आहेत जनतेपर्यंत असलेला चांगला संपर्क हा या भागातील भाजपा कार्यकर्त्यांची जमेची बाजू आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्राजक्ता रूमडे, तर प्रभाग क्रमांक ७ मधून निलेश आखाडे निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. दोन्ही कार्यकर्त्यांचा चांगला संपर्क असून येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दोन्ही प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीला लढण्यासाठी सीट मिळाली पाहिजे असा आग्रह वरिष्ठांकडे धरला. आणि हा संदेश पार्टी वरिष्ठानपर्यंत पोहोचवा कार्यकर्त्यांचे मन ओळखून कार्यकर्त्यांना संधी द्या असा आग्रह धरण्यात आला.
प्रभागातील माजी महिला ओबीसी जिल्हाध्यक्षा प्राजक्ता रुमडे यांनी आयोजित केलेल्या विनंतीनुसार प्रभागातील कार्यकर्ते व पदाधिकारी हितचिंतक यांनी एकत्रित येत या दोन्ही प्रभागांमध्ये एक जागा भाजपाला मिळावी. किंवा मैत्रीपूर्ण लढतीस परवानगी द्यावी अशी विनंती उपस्थित शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्याकडे करण्यात आली.
पक्ष संघटना आमच्या बाबत नक्की विचार करेल आणि दोन्ही प्रभागांमध्ये भाजपाला लढण्यासाठी संधी मिळेल असा विश्वास प्राजक्ता रूमडे व निलेश आखाडे यांनी यावेळी व्यक्त केला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर