नागपूर : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासूनच उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्यास सुरुवात होणार आहे. एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये यंदाच्या उन्हाळ्याबाबतची चर्चा झाली. जिथं यंदाचा उन्हाळा आणखी वाढेल हे स्पष्ट करण्यात आलं. देशाच्या पूर्वोत्त भागात आणि पश्चिमेकडील भागामध्ये तापमान सामन्य आकड्याच्या वरत राहू शकतं. यासाठी आता राज्य प्रशासनांना याच धर्तीवर सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागपुरात मंगळवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार इथं 15 ते 17 मार्च दरम्यान विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तसंच दक्षिण विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. तिथे चंद्रपुरातही मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. ढगांच्या गडगडाटासह चंद्रपुरात अवकाळी पाऊस बरसला. ज्यामुळं नागरिकांची धांदल उडाली. तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कापूस, गहू यासह धान उघड्यावर साठवून ठेवलंय. त्यामुळे या पावसानं शेतकऱ्यांची चिंताही वाढली.
उन्हाळा आणखी वाढणार
वाढता उन्हाळा पाहता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं तयारी करण्याचे निद्रेश हवामान विभागानं दिले आहेत. असं असतानाच स्कायमेटच्या (Skymet) माहितीनुसार पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या उत्तर भागासोबतच पश्चिम हिमालय, दक्षिण पश्चिम उत्तर प्रदेश या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. बुधवार आणि गुरुवारच्या दरम्यान झारखंड, मध्य प्रदेश, केरळ, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेश येथे पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळं या भागांना उष्णतेपासून (Heatwave) काहीसा दिलासाही मिळेल