कल्याणमध्ये भाजपचा ‘इन्कमिंग प्लॅन’ फेल:महेश गायकवाड यांची शिवसेनेत घरवापसी, शिंदेंचे मध्यरात्रीचे खलबत आणि ‘डॅमेज कंट्रोल’….

Spread the love

मुंबई- कल्याण पूर्वच्या राजकारणात एक मोठा आणि अनपेक्षित राजकीय ट्विस्ट घडला आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी सर्व तयारी पूर्ण झालेली असतानाच, माजी शिवसेना (शिंदे गट) नेते महेश गायकवाड यांनी ऐनवेळी यू-टर्न घेत पुन्हा शिवसेना शिंदे गटात घरवापसी केली आहे. या घडामोडीमागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मध्यरात्री झालेल्या चर्चांचा मोठा वाटा असल्याचे सूत्रांकडून समजते. इतकेच नव्हे, तर गायकवाड यांना कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघांचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे गायकवाड यांचे राजकीय वजन पुन्हा वाढले आहे.

*गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर बदलले समीकरण…*

गायकवाड यांचा शिंदे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर झाला होता. त्या घटनेनंतर त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी करत स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे शिंदे गटाने त्यांची तात्काळ हकालपट्टी केली होती.

हकालपट्टीनंतर गायकवाड यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी नवा मार्ग शोधण्यास सुरुवात केली आणि त्यांचा संपर्क भाजप नेते रवींद्र चव्हाण तसेच स्थानिक नेतृत्वाशी वाढला. भाजप प्रवेशाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती, मात्र शिंदे गटासाठी हा “डॅमेज” ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने तातडीने हस्तक्षेप केला.

*मध्यरात्रीचे खलबत आणि ‘डॅमेज कंट्रोल’…*

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्यरात्री महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधून मनधरणी केली. केवळ घरवापसी नव्हे, तर संघटनेतील महत्त्वाचे पद देण्याचे आश्वासन देण्यात आले. अखेर, गायकवाड यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेत पुन्हा एकदा शिंदे गटात परतण्याचा निर्णय घेतला.

*भाजपला मोठा धक्का…*

या घडामोडींमुळे कल्याण पूर्व आणि उल्हासनगरच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार आहे. भाजपच्या हातातून ओबीसी समाजातील एक ताकदवान चेहरा निसटल्याने पक्षाला धक्का बसला आहे. भाजपचा “इन्कमिंग प्लॅन” शेवटच्या क्षणी फेल ठरल्याचे मानले जात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी भाजपने दीपेश म्हात्रे यांना पक्षात घेऊन शिंदे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे कल्याणच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तासमीकरणांची नव्या स्वरूपात चुरस निर्माण झाली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t  कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*

*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*

*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी  7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*

*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav  वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page