
नगर परिषद निवडणुक आघाडी म्हणुनच लढवणार – माजी आमदार हुस्नबानू खलिफे व गणपत कदम यांची पत्रकार परिषदेत घोषणा…
राजापूर / प्रतिनिधी – राजापूर नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणार असल्याची मोठी घोषणा आघाडीच्या वतीने राजापूर येथे पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. आघाडीतील चारही पक्षामध्ये चांगला समन्वय असून जगवाटपा बाबत चांगली बोलणी झाली आहेत. आघाडीचे उमेदवार कोण असतील आणि कोणते पक्ष किती जागा लढवतील ते अर्ज सादर करताना दिसेल. नगराध्यक्ष पदासह स्पष्ट बहुमत मिळवून राजापूर नगर परिषदेवर आघाडीचाच झेंडा फडकेल असा आत्मविश्वास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.येथील काँग्रेस कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार गणपतराव कदम, काँग्रेसच्या माजी विधानपरिषद सदस्या ऍड हुस्नबानू खलिफे, शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख ऍड चंद्रप्रकाश नकाशे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरवात झाली आहे. लवकरच अर्ज सादर करायला सुरुवात होणार आहे. नगर परिषद निवडणुकीत महायुतीसह महा आघाडी होणार का याबाबत कमालीची उत्सुकता लागली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे या चार प्रमुख पक्षांच्या महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी राजापूर मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजापूर नगर परिषदेची निवडणूक महा विकास आघाडी म्हणूनच एकत्र लढविणार असल्याची जोरदार घोषणा उपस्थित आघाडीच्या नेत्यांनी केली आणि निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
त्यावेळी बोलताना माजी आमदार गणपतराव कदम म्हणाले की, राजापूर तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांच्या विरुद्ध लढायची . पण आता आम्हाला नियतीने एकत्र आणले आहे.
राजापूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी महाविकास आघाडी झालेली आहे. आणि ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. मात्र कोणत्या प्रभागात उमेदवार कसे असतील आणि आघाडीतील जागांचे वाटप कसे असेल ते उमेदवारी अर्ज सादर करताना दिसेल असे त्यांनी सांगितले.नगराध्यक्ष पदाचा आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला आहे.मात्र त्याची घोषणा वरिष्ठ पातळीवरून होणार असल्याचे माजी आमदार गणपतराव कदम यांनी स्पष्ट केले.या निवडणुकीत वीसच्या वीस जागा महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. या निवडणुकीत महाविकास आघाडी स्पष्ट बहुमत घेऊ अशी आम्हाला खात्री असल्याची ग्वाही माजी आमदार कदम यांनी दिली.
तर माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी निवडून येणारा उमेदवार हेच सूत्र असल्याचे स्पष्ट केले. राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत. त्याशिवाय राजापूर शहरातील काही पतसंस्था, सामाजिक संस्था, मंडळे, बँकांचे संचालक, आदी संस्थांशी सुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी संपर्क सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.आघाडीत काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. मात्र त्या पक्षाची काही मंडळी हि शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असून त्या पक्षात
प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता कोण कुणाला भेटले म्हणजे तो पक्ष प्रवेश होत नाही. राजकीय गाठीभेटी होत असतात आम्हाला देखील कोण कोण भेटत असतात. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आघाडी म्हणूनच लढणार असून आमचाच विजय निश्चित असल्याचे काँग्रेस नेत्या ऍड खलिफे यांनी स्पष्ट केले. राजापूर नगर परिषद निवडणुकीत आम्ही आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार आणि सर्व जागा जिंकून पालिकेत आघाडीचा झेंडा फडकविणार असा आत्मविश्वास शिवसेना ठाकरे गटाचे राजापूर विधानसभा संपर्क प्रमुख ऍड चंद्रप्रकाश नकाशे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या वतीने पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उबाठा) विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख कमलाकर कदम, शिवसेना (उबाठा) नेते रामचंद्र सरवणकर, माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, अनिल कुडाळी,शहर प्रमुख संजय पवार, अभय मेळेकर, मनसेचे श्री पवार, काँग्रेस शहराध्यक्ष अजीम जैतापकर आदी पदाधिकारी, उपस्थित होते.
फोटो –
महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार गणपतराव कदम, माजी विधान परिषद सदस्या ऍड हुस्नबानू खलिफे, शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख ऍड चंद्रप्रकाश नकाशे यासह आघाडीचे पदाधिकारी
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*