मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील गौरी भिडे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना 25 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि वाल्मिकी मेनेझेस यांनी ही याचिका फेटाळली आहे.
उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेविरोधात गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांकडे आरोप सिद्ध करणारे ठोस पुरावे नसून ही याचिका म्हणजे न्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचे सांगत न्यायालयाने गौरी भिडे यांची याचिका फेटाळून लावली. तसेच गौरी भिडे यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.